काही वेळा कामामुळे व्यक्तीला प्रतिष्टा प्राप्त होते. तर, कधी व्यक्तीमुळे कामाला. लंडनमधील स्टीफन फ्राई याच्याबाबत असेच घडले. या व्यक्तीने कामाला इतके वाहून घेतले की, आज त्याच्याकडे एक यशस्वी व्यक्तीच नव्हे तर, यशस्वी उद्योजक म्हणून पाहिले जाते. अगदी एखाद्या सेलिब्रेटीप्रमाणे हा व्यक्ती आपले आयुष्य जगतो. त्यासाठी मालदीवसारख्या नितांतसुंदर समुद्र किनाऱ्या वरही तो आपली सुट्टी व्यतित करतो. तो कॅनरी आयलॅंडमध्ये फिरतो आणि लंडनच्या उच्चभ्रू परिसरात राहतो.स्टीफनच्या कौटुंबिक पार्श्वभुमीबद्दल बोलायचे तर, त्याचे वडील पेशाने बिल्डर आहेत. पण, त्याला त्याच्या वडिलांच्या व्यवसायापेक्षा प्लंबींगच्या कामात ऋची होती.स्टीफन जेव्हा १७ वर्षांचा होता तेव्हा,नोकरी शोधण्यास मदत करणाऱ्या एका स्थानिक संस्थेमुळे त्याला प्लंबिंगच्या कामा बाबत माहिती मिळाली. त्याला ट्रेनिंगनंदर १०० पाऊंड प्रतिहप्ता उत्पन्न मिळू लागले.आज त्याची स्वत:ची कंपनी आहे.त्यात वर्षाकाठी २ कोटी कमावणार प्लंबर अशी ख्याती त्याने मिळवली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews